अयोध्या प्रकरणाची आजपासून सुनावणी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मागील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आता सुनावणी लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

नवी दिल्ली : अयोध्यातील राम मंदिर-बाबरी मशीद वादासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवार)पासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे.

मागील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आता सुनावणी लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

5 डिसेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकाराच्या वतीने म्हणणे मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले होते, की या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एवढी घाई का केली जात आहे? जुलै 2019नंतर या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे.
 
Web Title: Supreme Court To Start Final Hearings In Ayodhya Case