मूत्रपिंड निकामी झाल्याने सुषमा स्वराज रुग्णालयात

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

स्वराज यांनी नुकतेच 'एम्स' रुग्णालयात छातीत दुखत असल्याने दाखल करण्यात आले होते. या वर्षी एप्रिल महिन्यातही सुषमा स्वराज यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.

नवी दिल्ली - मूत्रपिंड निकामी झाल्याने एम्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले.

सुषमा स्वराज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की मित्रांनो, मी माझ्या प्रकृतीबाबत तुम्हाला माहिती देत आहे. मूत्रपिंड निकामी झाल्याने मी सध्या एम्स रुग्णालयात आहे. सध्या मी डायलिसिसवर आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणाबाबत चाचण्या सुरु आहेत. भगवान कृष्ण माझे रक्षण करतील.

स्वराज यांनी नुकतेच 'एम्स' रुग्णालयात छातीत दुखत असल्याने दाखल करण्यात आले होते. या वर्षी एप्रिल महिन्यातही सुषमा स्वराज यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.