डिओडरंटची 'ती' आक्षेपार्ह जाहिरात बंद करा; सरकारचे ट्विटर, युट्यूबला आदेश

टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडियावरील अश्लील आणि वादग्रस्त जाहिरातींना आळा बसावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
डिओडरंटची 'ती' आक्षेपार्ह जाहिरात बंद करा; सरकारचे ट्विटर, युट्यूबला आदेश

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक अश्लील जाहिरात व्हायरल होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वादग्रस्त जाहिरातीवर बंदी घातली आहे. समाजात तेढ आणि हिंसाचार निर्माण करणाऱ्या जाहिरातीवर निर्बंध घातले असून संहितेनुसार जाहिरातीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(Suspension Of Controversial Advertisement)

सध्या एक वादग्रस्त जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून लोकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यानतंर सरकारने ही जाहिरात ट्वीटर आणि युट्यूबवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी वादग्रस्त जाहिराती सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान Layer'r शॉट बॉडी स्प्रे जाहिरातीचे प्रकरण चांगलेच तापताना दिसत आहे. सोशल मिडियावर या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर भारत सरकारने ट्विटर आणि यूट्यूबला हे रेप जोक्स असलेली आक्षेपार्ह बॉडी स्प्रे जाहिरात काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.

दिल्ली महिला आयोगाची नोटीस

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल ने सांगितले की (लेयर'र शॉट) "डिओडोरेंट जाहिराती देशामध्ये बलात्काराची मानसिकतेला उत्तेजन देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे."आम्ही दिल्ली पोलिसांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत." सोबत त्यांनी सांगितले की ही जाहिरात सर्व प्लॅटफॉर्म्सवरून लगेच काढून टाकणे आवश्यक आहे.

भारतीय जाहिरात मानक परिषद (एएससीआय) ने सांगितले की, ही जाहीरात त्यांच्या कोडचे उल्लंघन आणि सार्वजनिक हिताच्या विरुद्ध आहे. अनेक वापरकर्त्याने ट्विटरवर एएससीआयला टॅग केल्यानंतर संघटनेने सांगितले की, आम्हाला टॅक केल्याबद्दल धन्यवाद. जाहिरात एएससीआय कोडची गंभीररित्या उल्लंघन करत आहे. त्यावर आम्ही त्वरीत कारवाई केली आहे आणि जाहिरातदारांना जाहिरात स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचं जाहिरात मानक परिषदेने सांगितलं आहे.

Layer'r च्या या जाहिरातीवर रेप कल्चरला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. कंपनीवर सोशल मीडियामधून जोरदार टीका केली जात आहे, या जाहिरातीमध्ये चार मुले एका स्टोअरमध्ये बोलताना दिसत आहेत, ते रॅकमध्ये परफ्युमची उरलेली शेवटची बॉटल पाहतात आणि आपापसांत चर्चा करताना एकजण म्हणतो आपण चार जण आहोत पण फक्त एक शॉट कोण घेणार, मात्र या जाहिरातीमध्ये बॉडी स्प्रे च्या जागी एक मुलगी दाखवण्यात आली आहे. ती मुलगी घाबरून मागे पाहाते, तीला वाटते की ही मुलं तीच्याविषयी बोलत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com