देशातील 'टॉप टेन' स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

स्वच्छते संदर्भातील  सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप 10' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली.

नवी दिल्ली : स्वच्छते संदर्भातील सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात देशातील 'टॉप 10' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत आठव्या स्थानावर नवी मुंबईचा समावेश झाला आहे. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भातील यादी आज (गुरुवार) जाहीर केली.

'स्वच्छ भारत' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. 'स्वच्छ सर्व्हेक्षण 2017' अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये देशातील 434 शहरातून माहिती घेण्यात आली. तर 37 लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. या सर्व्हेक्षणाबाबत आज केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी एका कार्यक्रमात माहिती दिली. सरकारच्या वतीने घेण्यात आलेले हे सर्वात मोठे सर्व्हेक्षण होते, असे नायडू यांनी सांगितले. नायडू यांनी देशभरातील 'टॉप 10' स्वच्छ शहरांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत इंदौर सर्वांत वरच्या स्थानावर आहे. तर नवी मुंबईला आठवे स्थान मिळाले आहे.

देशातील 'टॉप 10' स्वच्छ शहरे

  1. इंदौर, मध्य प्रदेश
  2. भोपाळ, मध्य प्रदेश
  3. विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश
  4. सूरत, गुजरात
  5. म्हैसूर, कर्नाटक
  6. तिरुचिरापल्ली, तमिळनाडू
  7. एनडीएमसी, नवी दिल्ली
  8. नवी मुंबई, महाराष्ट्र
  9. तिरुपती, आंध्र प्रदेश
  10. बडोदा, गुजरात