नोटाबंदी पुन्हा नको रे देवा !

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

 

 

कोईम्बतूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयातून सर्व सामान्य नागरिक अद्याप सावरला नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून, नोटाबंदी पुन्हा नको,'' अशी विनवणी तमिळनाडूतील नागरिक कालीमातेला करताना दिसत आहेत.

नववर्षाचे स्वागत करण्याची कोईम्बतूरमधील कालीमातेच्या मंदिरात देवीची नवीन नोटांसह पूजा करण्यात आली. मूर्तीसभोवती दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांची आरास करून देवीला अशी नोटाटंचाई पुन्हा नको, असे साकडे आम्ही घातल्याची माहिती मंदिरातील पुजारी कृष्णमूर्ती यांनी दिली.

कोणत्याही कार्याला सुरवात करायची झाल्यास त्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी, मग ते कार्य सिद्धीस जाते, अशी भक्तांची धारणा असून, सर्वत्र नोटांची टंचाई असताना या ठिकाणी पाच लाख रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध करून ही पूजा पार पाडण्यात आली.

Web Title: tamilnadu prays