अमरनाथ हल्ला; मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिला

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

मृतांमध्ये डहाणूतील निर्मलादेवी ठाकूर आणि उषा सोनकर या दोन महिलांचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये प्रकाश वजानी, भाग्यमनी ठाकूर, पुष्पा गोसावी, यशवंत डोंगरे, योगिता डोंगरे हे महाराष्ट्रातील भाविक आहेत.

श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या सात जणांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश आहे. या दोन्ही महिला डहाणू येथील रहिवाशी आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. पाच महिलांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिला आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीनगरला हलविण्यात आले आहे. तर, काही जणांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून दिल्लीला नेण्यात येणार आहे.

मृतांमध्ये डहाणूतील निर्मलादेवी ठाकूर आणि उषा सोनकर या दोन महिलांचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये प्रकाश वजानी, भाग्यमनी ठाकूर, पुष्पा गोसावी, यशवंत डोंगरे, योगिता डोंगरे हे महाराष्ट्रातील भाविक आहेत. यशवंत डोंगरे आणि योगिता डोंगरे हे दांपत्य पालघरमधील रहिवाशी आहे. यशवंत यांच्या कंबरेला, तर योगिता यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​