हंडवाडा येथे हल्ला; दोन दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

हंडवाडा - उरी येथील दहशतवादी हल्ल्याला "सर्जिकल स्ट्राईक' करून प्रत्युत्तर दिल्यानंतर खवळलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. बारामुल्ला येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर आज (गुरुवार) पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हंडवारा येथील लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

आज (गुरुवार) पहाटे दहशतवाद्यांनी हंडवारा येथील लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. "सर्जिकल स्ट्राईक' नंतर काश्‍मिरमध्ये दहशतवादी हल्ले वाढत चालले असून उत्सवांचा काळ असल्याने देशातील प्रमुख शहरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे.