दहशतवाद सुरू ठेवल्यास भारत- पाक चर्चा नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नगरोटामध्ये भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कठोर धोरण राबविण्यास सुरवात केली. सीमापार दहशतवाद सुरू ठेवल्यास द्विपक्षीय संबंधावर चर्चा होणार नाही, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला.

याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले, की नगरोटा हल्ल्याबाबत सविस्तर माहितीची भारत सरकारला प्रतीक्षा आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे आवश्‍यक आहे, ते सर्व सरकारकडून करण्यात येईल, असेही स्वरूप म्हणाले. दरम्यान, तीन व चार डिसेंबर रोजी अमृतसर येथे होणाऱ्या "हर्ट ऑफ आशिया' संमेलनामध्ये भारत-पाकिस्तानमध्ये दरम्यान द्विपक्षीय संबंधावर चर्चेचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही ते म्हणाले. भारत चर्चेसाठी कायम तयार आहे, मात्र दहशतवादाचे वातावरण कायम राहिल्यास कोणत्याही प्रकारची चर्चा शक्‍य नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गणी यांच्यामध्ये रविवारी संयुक्त स्वरूपात चर्चा होणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज प्रकृती अस्वास्थामुळे या चर्चेला उपस्थित राहणार नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. पाकिस्तानच्या नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीचा निर्णय हा त्यांचा अंतर्गत मुद्दा असल्याचेही स्वरूप यांनी या वेळी सांगितले.