बीएसएफ परीक्षेतील टॉपरला दहशतवाद्यांची धमकी

पीटीआय
बुधवार, 17 मे 2017

चंडिगड येथे शिक्षण घेत असलेल्या आपल्या बहिणीलाही अशा प्रकारच्या धमक्‍या आल्या असून, विद्यालय व्यवस्थापनाने तिला होस्टेल सोडण्याच्या सूचना केल्या आहेत, असे वणीने आपल्या पत्रात नमूद केले आहे...

नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाच्या वतीने (बीएसएफ) असिस्टंट कमांडंट पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने यश संपादन केलेल्या जम्मूतील नबील अहमद वणी यास दहशतवाद्यांकडून नोकरी सोडण्याच्या धमक्‍या येत आहेत. याबाबतची माहिती स्वतः नबील याने एका पत्राद्वारे सरकारला दिली.

चंडिगड येथे शिक्षण घेत असलेल्या आपल्या बहिणीलाही अशा प्रकारच्या धमक्‍या आल्या असून, विद्यालय व्यवस्थापनाने तिला होस्टेल सोडण्याच्या सूचना केल्या आहेत, असे वणीने आपल्या पत्रात नमूद केले आहे. आपली बहीण निदा रफीक हिची राहण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती नबीलने महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे केली आहे.

काश्‍मिरात नुकतीच उमर फैयाज या तरुण लष्करी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. अशातच हा प्रकार समोर आला आहे.