बीएसएफच्या गोळीबारात तीन ठार; दोन जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

गुरांची तस्करी करत असल्याच्या संशयावरून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन ठार तर दोन जखमी जण झाले आहेत.

आगरातळा (त्रिपुरा) - गुरांची तस्करी करत असल्याच्या संशयावरून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन ठार तर दोन जखमी जण झाले आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज (शनिवार) गुरांची तस्करी करत असल्याच्या संशयावरून काही जणांवर गोळीबार केला. त्यामध्ये पाराकुमार (वय 40), मनकुमार (वय 30), स्वरलक्ष्मी (वय 40) यांचा मृत्यू झाला. तर सुनिल कुमार (वय 47) आणि जीबान कुमार (वय 22) हे जखमी झाले. याबाबत बोलताना मृत स्वरलक्ष्मीची आई म्हणाली, "आम्ही जंगलातून सरपण घेऊन बाहेर पडलो. ते (बीएसएफ जवान) झाडांमध्ये लपून बसले होते. ते बाहेर आले आणि त्यांनी आमच्यावर गुरांची तस्करी करत असल्याचा आरोप केला. आम्ही आरोप नाकारत जंगल स्वच्छ करत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी गोळीबारच सुरू केला.'

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून स्थानिक पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.