डिझेलचोरीच्या आरोपावरून आदिवासी तरुणांना विवस्त्र करून मारहाण

Three tribals stripped naked beaten in MPs Jabalpur on charge of stealing diesel
Three tribals stripped naked beaten in MPs Jabalpur on charge of stealing diesel

जबलपूर : मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये तीन आदिवासी तरूणांना भरबाजारात विवस्त्र करून मारहाण केली. त्याच्यावर 120 लिटर डिझेल चोरीचा आरोप ठेवण्यात आला. वाहतूकदार आणि त्याच्या मित्राने या आदिवासी तरूणाला मारहाण केली. 

11 जुलैला ही घटना घडली. मात्र, याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पीडित तरूण आपल्या जीवाला घाबरत असल्याने त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी जबलपूरचे रहिवासी असलेले वाहतूकदार गुड्डू शर्मा आणि त्याचा मित्र शेरु यांची ओळख पटली आहे. पोलिसांनी या दोघांना फरारी घोषित केले आहे. 

सुरेश ठाकूर (46), आशिष गोंड (24) आणि गोलू ठाकूर (23) हे सर्व मंडला जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना गुड्डू आणि शेरू या दोघांनी विवस्त्र करून मारहाण केली. 120 लिटर डिझेल चोरीचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपातूनच त्याला मारहाण करण्यात आली. 

दरम्यान, या दोघांवर 'एस/एसटी प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रॉसिटी अॅक्ट'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com