महामार्गांवर टोल माफी आता 18 नोव्हेंबरपर्यंत

वृत्तसंस्था
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : नोटांवरील बंदीनंतर सुट्या पैशांची अडचण लक्षात घेऊन देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर देण्यात येणारी टोल माफीची सवलत वाढविण्यात आली आहे. 18 नोव्हेंबरच्या (शुक्रवार) मध्यरात्रीपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. 

नोटांवरील बंदीने त्रस्त नागरिकांना या मुदतवाढीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कारण मागील मंगळवारी मध्यरात्रीपासून टोलनाक्‍यांवर प्रवासी व टोल नाक्‍यावरील पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यावरून वाद सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले होते.

दरम्यान, यापूर्वी 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राज्यातील सर्व टोलनाके बंद करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती. यामध्ये मुंबईतील टोल नाक्‍यांचाही समावेश असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने यामध्ये जाहीर केलेली मुदतवाढही महाराष्ट्रात लागू करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.