विदेशी पर्यटकांना विमानतळावर मिळणार जीएसटी रकमेची परतफेड

gst
gst

नवी दिल्ली : परदेशी पर्यटकांना मालवाहतूक, तसेच वस्तु आणि सेवा कराची परतफेड मिळणे शक्य होऊ शकते. महसुल विभाग हा स्थानिक खरेदीवर भरलेल्या कर परताव्यांकरिता यंत्रणा चालवत आहे. सुरवातीच्या काळात, केवळ मोठ्या रिटेलरकडुन खरेदी केलेल्या मालावरच पर्यटकांना वस्तु आणि सेवा कराची परतफेड मिळेल, अशी माहिती अधिकृत अधिकाऱ्यांनी दिली.

ठराविक चौकटीच्या बाहेर केल्या गेलेल्या (थ्रेशहोल्ड) खरेदीवर अनेक देशांमध्ये व्हॅट किंवा जीएसटी कर परत दिले जातात. 'महसूल विभाग विदेशी पर्यटकांना जीएसटीची परतफेड करता येईल, याकरिता क्षेत्रीय कार्यालयांत सुरक्षित यंत्रणा उभारत आहे.' अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. त्यांनी सांगितले की, बनावट चलनांच्या आधारे परतफेड दिली जाणार नाही, परतावा पद्धती ही मोठ्या रिटेलरने जारी केलेल्या चलनांच्या आधारावर केली जाईल.

जीएसटी कायद्यामध्ये पर्यटकांना जीएसटी परताव्याची रक्कम दिली जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्यावर प्रत्यक्षात कुठलीही प्रक्रिया केली गेली नाही.

कायद्याने 'पर्यटक' हा शब्द सामान्यतः भारतातील रहिवासी नसलेल्या, तसेच पर्यटनासाठी आलेला आणि सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ भारतात न थांबणारा, अशा व्यक्तीसाठी वापरला आहे. एएमआरजी अँड असोसिएट्सचे अधिकारी रजत मोहन म्हणाले की, पर्यटन परताव्यामुळे पर्यटन विपणन तंत्रज्ञान विकसित होईल, ते देशाच्या अर्थखात्यासाठी अनेक अर्थांनी फायद्याचे असेल. ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये, एकापेक्षा अधिक रिफंड एजन्सीज आणि किरकोळ विक्रेत्यांना एका प्लॅटफॉर्मवर जोडणारी ऑनलाइन व्यवस्था आहे, जी पर्यटकांना कर परताव्याची पडताळणी, प्रक्रिया आणि वितरण सोयिस्कररित्या करुन देते. अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवुन घेणे हे भारतीय समकक्षांसाठी एक दुःस्वप्न असू शकते." 

ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, सिंगापूर, जपान, मलेशिया, युनायटेड किंग्डम आणि स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये काही अटींचा समावेश करुन आंतरराष्ट्रीय पर्यटकांना व्हॅट किंवा जीएसटी परतावा देतात. या देशांतील कर परताव्याचा लाभ घेण्यासाठी खर्च केलेल्या किमान रकमेची मर्यादा देखील आहे.

ऑस्ट्रेलियात, कराचा लाभ घेण्यासाठी किमान खर्च 300 ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 15,000 रुपये) आहे. तसेच, एकाच व्यावसायिकाकडून त्याच ऑस्ट्रेलियन व्यावसायिक क्रमांकासह  माल विकत घ्यावा अशी अट आहे. सिंगापूरच्या बाबतीत नियम ठरलेले आहेत. येथे किमान खरेदीची रक्कम एसजीडी 100 (सुमारे 5,000 रुपये) आहे, तर जपान व स्वित्झर्लंडसाठी ही सीमा 5,401 येन (सुमारे 3000 रुपये) आणि 300 स्विस फ्रँकवर (सुमारे रु. 20,000) अनुक्रमे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com