पंडित नेहरूंना देशभर श्रद्धांजली 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी नेहरूंना श्रद्धांजली वाहिली. 

नवी दिल्ली - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी नेहरूंना श्रद्धांजली वाहिली. 

शांतीवनातील पंडीत नेहरूंच्या स्मारकाला भेट देऊन राहुल गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद, अशोक गेहलोत आणि मोतीलाल व्होरा आदींनी पुष्पांजली वाहिली. या वेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. 

पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमांतून नेहरूंना श्रद्धांजली अर्पण केली. देशात विविध ठिकाणी नेहरूंना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Web Title: Tribute to Pandit Nehru