पतीला तलाक देण्याची त्रस्त पत्नीची इच्छा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मातील एखादा पुरुष 'तलाक, तलाक, तलाक' म्हणून आपल्या पत्नीपासून सुटका करून घेऊ शकतो. त्याचप्रकारे मलाही मुस्लिम समुदायासमोर 'तलाक, तलाक, तलाक' असे म्हणत त्याला तलाक द्यायचा आहे', अशी इच्छा पीडित महिलेने पोलिस अधिकाऱ्याकडे व्यक्त केली.

मेरठ (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'चे नवनवीन प्रकरणे रोज समोर येत आहेत. मात्र मेरठमध्ये पतीने पत्नीला नव्हे तर पत्नीनेच अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पतीला तलाक देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका 24 वर्षाच्या महिलेचा आणि तिच्या बहिणीचा 2012 मध्ये एकाच कुटुंबातील दोन भावांशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासून या दोघींचेही पती दोघींनाही त्रास देत मारहाण करत होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये धाकट्या बहिणीला किरकोळ भांडणावरून तिच्या पतीने तोंडी तलाक दिला. त्यानंतर दोन्ही बहिणी आपल्या माहेरी निघून गेल्या. या प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने बुधवारी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'माझे पती काहीही बोलत नाहीत. ते मला, माझ्या मुलांना पैसे देत नाहीत. मला त्याला तुरुंगात पाठवायचे आहे. मला माझ्या पतीला तलाक द्यायचा आहे. ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मातील एखादा पुरुष 'तलाक, तलाक, तलाक' म्हणून आपल्या पत्नीपासून सुटका करून घेऊ शकतो. त्याचप्रकारे मलाही मुस्लिम समुदायासमोर 'तलाक, तलाक, तलाक' असे म्हणत त्याला तलाक द्यायचा आहे', अशी इच्छा पीडित महिलेने पोलिस अधिकाऱ्याकडे व्यक्त केली.

मुस्लिम धर्मात तोंडी तलाक देऊन ज्याप्रमाणे पती त्याच्या पत्नीशी झालेला विवाह संपुष्टात आणू शकतो. त्याचप्रमाणे पत्नीलाही तलाक देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017