त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

डेहराडून- उत्तराखंड भाजपचे माजी अध्यक्ष त्रिवेंद्र सिंग रावत उद्या (शनिवारी) उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्रिवेंद्र सिंग रावत त्यांच्या डोईवाला या पारंपारिक मतदारसंघातुन 24,000 मतांनी निवडुन आले आहेत.

शुक्रवारी डेहराडूनमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी आमदार त्रिवेंदसिंह रावत यांची निवड करण्यात आली आहे.त्रिवेंद्र सिंग रावत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. तसेच ते अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी रावत उत्तर प्रदेशात अमित शहांबरोबर काम करत होते.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने उत्तराखंडमधील 70 पैकी 57 जागांवर विजय मिळवला.

उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजेच्या सुमारास उत्तराखंड च्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल असे उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष अजय भट यांनी सांगितले.या शपथविधीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 
Web Title: Trivendra Singh Rawat next CM of Uttarakhand