संपूर्ण तूरडाळ खरेदी करणार - सुभाष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 मे 2018

नवी दिल्ली - तूरडाळ खरेदीला लवकरच मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. शेतकऱ्यांकडून संपूर्ण तूरडाळ खरेदी केल्याशिवाय राज्य सरकार खरेदी केंद्रे बंद करणार नाही, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले.

नवी दिल्ली - तूरडाळ खरेदीला लवकरच मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकूल आहे. शेतकऱ्यांकडून संपूर्ण तूरडाळ खरेदी केल्याशिवाय राज्य सरकार खरेदी केंद्रे बंद करणार नाही, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले.

तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी देशमुख यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याशी चर्चा केली. तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र अनुकूल आहे असे सांगून देशमुख म्हणाले, की तथापि राधामोहनसिंह यांनी याबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. देशमुख म्हणाले, की राज्यात यावर्षी एक फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरवात झाली. खरेदी कालावधी संपल्यानंतर १५ मेपर्यंत केंद्राने मुदतवाढ दिली होती. मात्र, यावर्षी तूर खरेदीचे उद्दिष्ट ४४ लाख क्विंटल असून त्यापैकी १९३ खरेदी केंद्रांवर ३३ लाख १५ हजार १३२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. आणखी मुदतवाढ मिळणे आवश्‍यक आहे असे मी कृषिमंत्र्यांना सांगितले आहे.

घरचं झालं थोडं...
भारताने एका आंततराष्ट्रीय काररांतर्गत मोझांबिकबरोबर तूर खरेदीचा पाच वर्षांचा करार केल्याने त्याचे पालन करण्यासाठीच ‘घरचं झालं थोडं...’ या धर्तीवर तूरडाळ खरेदी करण्याचे बंधन सरकारवर आल्याची माहिती आहे. मोझांबिककडून भारत दरवर्षी तब्बल दोन लाख टन तूरडाळ आयात करत आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी त्या देशात दुष्काळ होता व भारतात तूर टंचाई होती. या कराराची मुदत अद्याप बाकी असून, जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमानुसार असे करार एकतर्फी मोडता येत नाहीत.

४४ लाख क्विंटल तूर खरेदीचे उद्दिष्ट 
१९३ खरेदी केंद्रे 
३३,१५,१३२  क्विंटल झालेली तूर खरेदी

Web Title: turdal purchasing subhash deshmukh