आगरताळाहून आसामसाठी दोन नव्या साप्ताहिक रेल्वे

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

आगरताळा - उत्तर पूर्व रेल्वेने चार महिन्यांसाठी आगरताळा, गुवाहाटी आणि दिब्रुगडदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्रिपुरा सरकारने स्वागत केले आहे. गुवाहाटी आगरताळा ही साप्ताहिक रेल्वे दर शनिवारी गुवाहाटीहून दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि आगरताळाला रविवारी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी पोचेल. त्यानंतर ही गाडी आगरताळाहून दुपारी तीन वाजता सुटेल आणि गुवाहाटीला सोमवारी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी पोचेल. बारा नोव्हेंबरपासून ही गाडी सुरू होईल. दिब्रुगड ते आगरताळादरम्यान अन्य एक विशेष गाडी 21 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

आगरताळा - उत्तर पूर्व रेल्वेने चार महिन्यांसाठी आगरताळा, गुवाहाटी आणि दिब्रुगडदरम्यान दोन साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे त्रिपुरा सरकारने स्वागत केले आहे. गुवाहाटी आगरताळा ही साप्ताहिक रेल्वे दर शनिवारी गुवाहाटीहून दुपारी 4 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि आगरताळाला रविवारी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी पोचेल. त्यानंतर ही गाडी आगरताळाहून दुपारी तीन वाजता सुटेल आणि गुवाहाटीला सोमवारी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी पोचेल. बारा नोव्हेंबरपासून ही गाडी सुरू होईल. दिब्रुगड ते आगरताळादरम्यान अन्य एक विशेष गाडी 21 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ही गाडी दिब्रुगडहून दर रविवारी रात्री साडेदहाला सुटेल आणि आगरताळाला सोमवारी सायंकाळी सात वाजता पोचेल. सोमवारी रात्री दहा वाजता ही गाडी आगरताळाहून निघेल आणि दिब्रुगडला मंगळवारी सायंकाळी सात वाजून 20 मिनिटांनी पोचेल.