नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन पोलिस हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

सिमडेगा जिल्ह्यातील नक्षलप्रभावित महाबुयांग ठाणा परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन पोलिस हुतात्मा झाले आहेत.

सिमडेगा (झारखंड) - सिमडेगा जिल्ह्यातील नक्षलप्रभावित महाबुयांग ठाणा परिसरात शनिवारी रात्री नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन पोलिस हुतात्मा झाले आहेत.

शनिवारी सिमडेगापासून 65 किलोमीटर अंतरावरील महाबुयांग येथे प्रशासनाच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. याच ठिकाणी 11 एप्रिल रोजी राज्याचे मुख्य सचिव राजबाला वर्मा यांचा कार्यक्रम होणार आहे. जनता दरबारासह या कार्यक्रमाच्या तयारीसाठी महाबुयांग ठाण्याचे प्रभारी पोलिस कर्मचाऱ्यांसह महाबुयांग येथे आले होते. सर्व कार्यक्रम संपवून परतत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळ काढण्यात यशस्वी ठरले.

या घटनेत ठाण्याचे प्रभारी विद्यापती सिंह आणि पोलिस हवालदार तरुण बुराली गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Two policemen killed in encounter with Maoists