योगींची निवड 21 व्या शतकातील सर्वोत्तम बातमी- उमा

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

योगी आदित्यनाथ माझा लहान भाऊ असून, त्यांची निवड ही सर्वोत्तम बातमी आहे. त्यांच्या निवडीमुळे कट्टरपंथीयांच्या गालावर जोरदार थप्पड बसली आहे. योगी विकास आणि राष्ट्रवाद पुढे घेऊन जातील.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे आणि लहान बंधू योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड होणे, या 21 व्या शतकातली सर्वात चांगल्या बातम्या असल्याचे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे.

आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर उमा भारती म्हणाल्या, की योगी आदित्यनाथ माझा लहान भाऊ असून, त्यांची निवड ही सर्वोत्तम बातमी आहे. त्यांच्या निवडीमुळे कट्टरपंथीयांच्या गालावर जोरदार थप्पड बसली आहे. योगी विकास आणि राष्ट्रवाद पुढे घेऊन जातील.

उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर भाजपने शनिवारी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली. या निवडीनंतर भाजप नेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेले केशव प्रसाद मौर्य यांनीही आदित्यनाथ यांच्या निवडीबाबत कोणताही वाद नसल्याचे म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.