UPSC : कर्नाटकची नंदिनी देशात अव्वल

पीटीआय
बुधवार, 31 मे 2017

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये कर्नाटकच्या नंदिनी के. आर. हिने देशात अव्वल स्थान पटकावले. भारतीय प्रशासकीय अधिकारी बनण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती, असे नंदिनीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

अनमोल शेर सिंग बेदी अणि जी. रोनान्की यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले. आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा), आयएफएस (भारतीय विदेश सेवा), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवांच्या नियुक्तीसाठी एकूण 1099 उमेदवारांची निवड करण्यात आली.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ही नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.