आझम खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
रविवार, 2 जुलै 2017

रामपूर (उत्तर प्रदेश): भारतीय लष्कराबाबत अवमानजनक उद्‌गार काढल्याचा आरोप असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात आज तीन पोलिस ठाण्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला. खान यांच्या विधानानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचे शीर आणि जीभ कापून आणणाऱ्यास इनाम जाहीर केले आहे.

विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अनिल पांडे यांनी याप्रकरणी प्रथम तक्रार दाखल केली होती. "सुरक्षा दले बळजबरी करत असल्यामुळे काही ठिकाणच्या महिलांनी अशा जवानांचे गुप्तांग कापल्याच्या घटना घडल्या आहेत,' असे विधान आझम झान यांनी केले होते. दरम्यान, विहिंपचे स्थानिक नेते राजेशकुमार अवस्थी यांनी आझम खान यांची जीभ कापून आणणाऱ्यास पन्नास लाखांचे इनाम जाहीर केले आहे; तर गोरक्षा संघटनेचे प्रमुख मुकेश पटेल यांनी खान यांना "दहशतवादी' असे संबोधत त्यांचे शीर कापून आणणाऱ्यास एकावन्न लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.