उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर; सुरक्षा वाढवली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 जुलै 2017

जर विधानसभेत विरोधीपक्षातील नेत्यांच्या खुर्चीखाली स्फोटकं सापडत असतील तर, उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दशा काय असेल याचा फक्त विचार करा.
- कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद

लखनौ : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत संशयास्पद पांढरी स्फोटक पावडर सापडल्याने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) उच्चस्तरीय बैठक बोलावली. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य मलोज पांडे यांच्या खुर्चीखाली 60 ग्रॅमचा पांढऱ्या पावडरीचा पुडा आढळला. त्यानंतर, विधानसभेतील सुरक्षा वाढवण्यात आली. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पेंटेरिथ्रिटोल टेटॅनिरेट्रेट ही स्फोटके सापडल्याची कबुली दिली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. "सर्वांनीच सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. विधानसभेतील कामगारांची पोलिसांकडून पडताळणी केली जावी, कारण ही घटना दहशतवादी कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही," असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

प्रांतीय सशस्त्र दल आणि जलद प्रतिसाद कार्यसंघ यांची विधानसभेत नेमणूक करण्यात येणार असल्याचे उत्तरप्रदेश विधानसभेचे प्रवक्ते हृदया नारायण दीक्षित यांनी स्पष्ट केले. पेंटेरिथ्रिटोल टेटॅनिरेट्रेट हे अत्यंत शक्तीशाली स्फोटक आहे आणि ते प्लॅस्टिकसारखे असल्याने मेटल डिटेक्टरसमध्ये निदर्शनास येत नाही. 

या प्रकरणानंतर विरोधीपक्षातील नेत्यांनी उत्तप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. "जर विधानसभेत विरोधीपक्षातील नेत्यांच्या खुर्चीखाली स्फोटकं सापडत असतील तर, उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दशा काय असेल याचा फक्त विचार करा," असे मत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद व्यक्त केले. 

ई सकाळवरील आणखी बातम्या : 
काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी नको- चीनला भारताचा इशारा
अडीच वर्षांच्या अवीर जाधवचा नवा विक्रम
बाणेर-हिंजवडी रस्त्यास शेतकऱ्यांचा विरोध
पंतप्रधानांनी हिटलरचा मार्ग पत्करावा - संजय राऊत
कर्नाटकमध्ये पेट्रोल सव्वाआठ रुपये स्वस्त

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

10.03 PM

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

09.03 PM

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

04.39 PM