बलात्कारप्रकरणी हिंदू युवा वाहिनीच्या तिघांना अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

बरेली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना सामूहिक बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बरेली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यानी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनी या संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना सामूहिक बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अविनाश व दीपक नामक दोन व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर अविनाशने युवा वाहिनीचा कार्यकर्ता असलेल्या एका मित्रास बोलावून घेतले. नंतर दोघांनी दीपकच्या घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दीपक व त्याच्या भावाने अविनाशला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार समजताच युवा वाहिनीचे स्थानिक अध्यक्ष जितेंद्र शर्मा, युनिट अध्यक्ष पंकज यांसह इतर कार्यकर्ते पोलिस ठाण्यात आले. दरम्यान, भाजपचे शहर प्रमुख उमेश कथारिया हेही तेथे दाखल झाले. कथारिया व युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर शर्मा व इतरांनी एका पोलिस निरीक्षकास मारहाण केली. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी अविनाश, जितेंद्र आणि पंकज या तिघांना अटक केली आहे.