बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थीनींवर लाठीमार; आंदोलन हिंसक

वृत्तसंस्था
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस वाराणसी दौऱ्यावर होते. त्यांचा दौरा संपताच शनिवारी रात्री हा हिंसाचार उसळला. विद्यार्थीनींशी होत असलेल्या छेडछाडीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थीनींवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तर, याची माहिती मिळाल्यानंतर मुलांच्या वसतीगृहांमधून पोलिस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बाँम्ब फेकण्यात आले.

वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींशी होणाऱ्या छेडछाडीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला शनिवारी रात्री हिंसक वळण लागले. वसतीगृहांमधून पोलिसांवर दगड व पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. तर, पोलिसांकडून विद्यार्थीनींवर जोरदार लाठीमार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस वाराणसी दौऱ्यावर होते. त्यांचा दौरा संपताच शनिवारी रात्री हा हिंसाचार उसळला. विद्यार्थीनींशी होत असलेल्या छेडछाडीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थीनींवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तर, याची माहिती मिळाल्यानंतर मुलांच्या वसतीगृहांमधून पोलिस आणि अर्धसैनिक दलांच्या जवानांवर दगड आणि पेट्रोल बाँम्ब फेकण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आज (रविवार) सकाळी परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

व्हीसी लॉजजवळ पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचे वृत्त आल्यानंतर हा हिंसाचार भडकला. हे विद्यार्थी छेडछाडीच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या विद्यार्थिनींचे समर्थन करत आहेत. या हिंसक घटनांमुळे विद्यापीठ 2 ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. कुलगुरू जी. सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शन करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थीनींवर सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.