सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला; काँग्रेसला धक्का! 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 एप्रिल 2018

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार) फेटाळला. 'या प्रस्तावामध्ये 'गुणवत्ता' नाही', असे निरीक्षण नायडू यांनी नोंदविले आहे. 

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा विरोधी पक्षांचा प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी आज (सोमवार) फेटाळला. 'या प्रस्तावामध्ये 'गुणवत्ता' नाही', असे निरीक्षण नायडू यांनी नोंदविले आहे. 

'महाभियोग प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी करून आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर 'हा प्रस्ताव दाखल करून घेण्याजोगा नाही' असे माझे मत बनले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळत आहे', असे नायडू यांनी स्पष्ट केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर महाभियोग चालविण्याचा प्रस्ताव काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी मांडला होता. त्यामुळे राज्यसभाध्यक्षांचा हा निर्णय म्हणजे काँग्रेसला मोठा धक्का आहे, असे मानले जात आहे. 

'महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील पावले उचलू', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पी. एल. पुनिया यांनी व्यक्त केली. 'हा प्रस्ताव फेटाळल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्ण्याचा विचार सुरू आहे', असे काँग्रेसने शनिवारी सांगितले होते. 

महाभियोग प्रस्तावास अनुमोदन दिलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष आणि मुस्लिम लीग यांचा समावेश आहे. या प्रस्तावावर वेंकय्या नायडू यांनी काल कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली होती. यात ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाळ यांचाही समावेश होता. तसेच, यासंदर्भात नायडू यांनी लोकसभेचे सचिव सुभाष कश्‍यप, माजी सचिव पी. के. मल्होत्रा आणि संजय सिंह यांच्याशीही चर्चा केली होती. 

Web Title: Venkaiah Naidu rejects Opposition notice for removal of chief justice Dipak Misra