एनडीटीव्हीवर छापा टाकलेला नाही व्येंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

पीटीआय
गुरुवार, 8 जून 2017

नवी दिल्ली - एनडीटीव्हीच्या कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोणताही छापा टाकला नसल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्येंकय्या नायडू यांनी आज स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांच्या गळचेपीच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले.

बॅंकेत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने पाच जून रोजी प्रणव रॉय यांच्या एनडीटीव्हीवर छापा टाकला होता. सीबीआयच्या या कारवाईचा अनेक राजकीय पक्षांनी निषेध केला होता. त्याचप्रमाणे एडिटर गिल्ड ऑफ इंडिया, प्रेस क्‍लब ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया न्यूज पेपर एडिटर्स कॉन्फरन्सनेही त्याचा निषेध केला होता. सीबीआयने एनडीटीव्हीवर छापा टाकला नाही. त्याचप्रमाणे एनडीटीव्हीच्या कोणत्याही न्यूजरुममध्ये, प्रीमायसिसमध्ये किंवा टीव्ही स्टुडिओमध्ये त्यांनी प्रवेश केलेला नाही. या वाहिनीचे व्यवस्थापन आणि प्रवर्तकांनी त्यांच्यावरील आरोपांची जनतेला उत्तरे दिली पाहिजेत, असे नायडू यांनी एका कार्यक्रमानंतर सांगितले. वाहिनीवरील कारवाई म्हणजे बदला असल्याचा दावा फेटाळून लावीत नायडू म्हणाले की, एनडी टीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी कायद्याच्या आधारे आपले खुलासे करावेत.