विश्‍वनाथ यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

पीटीआय
सोमवार, 24 एप्रिल 2017

"स्वाथी मुथायम' हा त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 59 व्या अकादमी पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी पाठविण्यात आला होता. याशिवाय, संकरभरणम या त्यांच्या चित्रपटासही भारतासहित जगभरातून वाखाणण्यात आले होते

नवी दिल्ली - प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते कसिनाधुनी विश्‍वनाथ यांना 2016 वर्षामधील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज (सोमवार) केली.

सुवर्ण कमळ , शाल व 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विश्‍वनाथ यांना येत्या 3 मे रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या समारंभामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विश्‍वनाथ यांना आत्तापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यांना 10 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.

"स्वाथी मुथायम' हा त्यांचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 59 व्या अकादमी पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी पाठविण्यात आला होता. याशिवाय, संकरभरणम या त्यांच्या चित्रपटासही भारतासहित जगभरातून वाखाणण्यात आले होते.