सेहवागकडून गुढी पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

आपण सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आनंदामध्ये प्रेमाने रहा व खूप मज़ा करा.

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशभरात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा होत असून, भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मराठीतून ट्विट करत गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रातील नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विट करत शुभेच्छा देताना म्हटले आहे, की आपण सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आनंदामध्ये प्रेमाने रहा व खूप मज़ा करा.

पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, की गुढी पाडव्यानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हाला आनंद व उत्तम आरोग्य देवो.

Web Title: virender sehwag marathi tweet about gudhi padva wishes