दिव्यांग आयुक्‍त नेमणार कधी?

handicapped
handicapped

पणजी : सुमारे पाच महिन्यांपासून दिव्यांगांच्या कल्याणासाठी पूर्ण वेळ काम करणारा राज्य दिव्यांग आयुक्‍त नाही. सध्या हा पदभार समाज कल्याण खात्याच्या संचालकांकडे देण्यात आला असून दिव्यांग जणांना अनेक कामांच्या बाबतीत अडचणी येत असल्याचे दिव्यांग हक्‍क संघटनेचे (ड्रॅग) म्हणणे आहे. दिव्यांग जणांशी निगडित असणारे प्रश्‍न दिवसेंदिवस वाढत असून लवकरात लवकर या प्रश्‍नावर तोडगा काढून दिव्यांग आयुक्‍तांची नेमणूक करावी, अशी मागणी ड्रॅगतर्फे करण्यात येत आहे. 

राज्यात दिव्यांगाशी निगडित अनेक प्रश्‍न पडून असल्याचे निदर्शनातून लक्षात येते. राज्यात असणाऱ्या अनेक सार्वजनिक वाहने दिव्यांग बांधवांना प्रवास करण्यायोग्य नाहीत. गोव्याचे आकर्षण असणारे समुद्रकिनारेही दिव्यांग जणांच्या सोईसारखे नाहीत. गोव्यातील तसेच गोव्याबाहेरून निसर्ग सौदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या आणि व्हीलचेअर वापरणाऱ्या दिव्यांग बांधवांना समुद्रकिानाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी कसरत करावी लागते तर अनेकांना तेथेपर्यंत जाणे शक्‍य नसल्याने त्यांचा हिरमोड होतो. राज्यातील अनेक सार्वजनिक तसेच खासगी इमारतींमध्येही जाण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी वेगळी सोय नसल्याचे लक्षात येते. अशी परिस्थिती असताना राज्यात दिव्यांग आयुक्‍त पदासाठी स्वतंत्रपणे काम करणारे व्यक्‍ती नसणे निराशाजनकच आहे. 

राज्यात दिव्यांगांची संख्या अधिक आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक दिव्यांग व्यक्‍तीमध्ये काहीतरी वेगळे आणि प्रागतिक करून दाखविण्याची धमक आहे. दिव्यांगांच्या स्वप्नांना सरकारी व्यवस्थेने पाठिंबा देणे गरजेचे आहे. सध्या राज्य दिव्यांग आयुक्‍त या पदाच्या सर्व जबाबदाऱ्या संचालकांकडे सोपविण्यात आल्या आहेत. खरे पाहता त्यांच्याकडे असणाऱ्या कामाच्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना दिव्यांग बांधवांसाठी वेगळा वेळ काढणे अशक्‍य आहे. सध्या राज्यभरात दिव्यांग जणांच्या बाबतीतील अनेक प्रश्‍न प्रलंबित असून यासाठी स्वतंत्र आयुक्‍त असणे आवश्‍यक असल्याचे मत ड्रॅगचे आविलिनो डिसा यांनी व्यक्‍त केले. 

दरम्यान समाज कल्याण खात्याचे उपसंचालक सुदेश गावडे यांनी दिव्यांग आयुक्‍त हा पदभार जरी संचालकांकडे दिला असला तरी दिव्यांग जणांची सर्व कामे व्यवस्थित होत असल्याचा खुलासा केला. दिव्यांग बांधवांच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मार्ग करून देण्याचा प्रयत्न समाज कल्याण खात्याचे संचालक करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com