"मुस्लिमांनी काहीही केलं तरी मंदिर उभारणारच"

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

कटियार म्हणाले, "परस्पर सहमतीने हे प्रकरण संपावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, मुस्लिम सहमती दर्शविणार नाहीत. ते चर्चेपासून दूर पळत आहेत. त्याबाबत आम्ही काय करू शकतो?" 

आयोध्या : राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा हा मुस्लिमांसाठी साधा मुद्दा नाही, तर ती एक अहंहमिका (इगो वॉर) आहे, असे भाजपचे नेते विनय कटियार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुस्लिमांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी राम मंदिर तिथेच बांधले जाईल, असे त्यांनी सांगितले. 

कटियार म्हणाले, "परस्पर सहमतीने हे प्रकरण संपावे अशी आमची इच्छा आहे. परंतु, मुस्लिम सहमती दर्शविणार नाहीत. ते चर्चेपासून दूर पळत आहेत. त्याबाबत आम्ही काय करू शकतो?" 

राम मंदिराच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्तावाचे कटिया यांनी स्वागत केले. 
कटियार म्हणाले, "आयोध्येत अनेक मशिदी आहेत, त्यामुळे मुस्लिमांना मशीद बांधण्याची चिंता नाही. मशीद बांधण्यासाठीचा हा संघर्ष नाही, तर केवळ तिथेच मशीद बांधण्याची ही अहंहमिका आहे."
ती जमीन आमची आहे आणि तिथे राम मंदिर बांधले जाईल याची दक्षता आम्ही घेऊ, असे त्यांनी सांगतिले. 

त्या ठिकाणी मंदिर आणि मशीद दोन्हींचे बांधकाम सुरू करण्याची आमची तयारी आहे. परंतु, मशिदीचे बांधकाम नदीच्या पलीकडे करण्यात यावे, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. स्वामी यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती.  

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर तातडीची सुनावणी घेतली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी परस्पर सामंजस्याने हे प्रकरण सोडविण्यास सांगितले. बोलणी फिसकटल्यास सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांनी मध्यस्थाची भूमिका निभावण्याची तयारी सुनावणीदरम्यान दर्शवली होती.