गुरुदासपूर येथे महिलेवर सामूहिक बलात्कार

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

राजन सिंह या व्यक्तीने शनिवारी जबरदस्तीने घरात घुसून बलात्कार केल्याचे या तक्रारीत महिलेने म्हटले आहे. त्याशिवाय राजन याने त्याच गावात राहणारे आपले मित्र जगरूप सिंह, रुबल, पम्मा आणि गोपा यांनाही घटनास्थळी बोलविले होते

गुरुदासपूर - येथील निकोसरन गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. पीडित महिलेने बाटला येथील पोलिस ठाण्यात जाऊन याबद्दल तक्रार दाखल केली.

राजन सिंह या व्यक्तीने शनिवारी जबरदस्तीने घरात घुसून बलात्कार केल्याचे या तक्रारीत महिलेने म्हटले आहे. त्याशिवाय राजन याने त्याच गावात राहणारे आपले मित्र जगरूप सिंह, रुबल, पम्मा आणि गोपा यांनाही घटनास्थळी बोलविले होते. या संशयितांनी बलात्कार करून पीडित महिलेला या बद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती, असे या तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पाच जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील राजन, जगरूप आणि रुबल यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.