हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळ दोषी

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

हैदराबाद- शहरातील दिलसुखनगर येथे सन 2013 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासिन भटकळ याच्यासह चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

हैदराबाद- शहरातील दिलसुखनगर येथे सन 2013 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासिन भटकळ याच्यासह चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

भटकळला 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्याला दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यांना 19 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी रियाझ भटकळ अद्याप फरार आहे. 21 फेब्रुवारी 2013 रोजी दिलसुखनगरच्या बसस्टॉपजवळ तसेच कोणार्क थिएटर समोर सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 18 जण ठार तर 131 जण जखमी झाले होते. दोन्ही स्फोट पाच मिनिटांच्या अंतरानी झाले होते. या स्फोटांमध्ये आयईडीचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

कर्नाटकातील उडपीचा रहिवासी असलेला भटकळ हा अहमदाबाद, सुरत, बंगळुरु, पुणे, दिल्ली, हैदराबादमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी वाँटेड होता. 2007 मधील वाराणसी, फैजाबाद, लखनौ स्फोट, 11 जुलै 2006 चा वाराणसी स्फोट, 11 जुलै 2006मध्ये मुंबईतील लोकलमधले साखळी स्फोट व 25 ऑगस्ट 2007 रोजी हैदराबादमध्ये झालेले दुहेरी स्फोट यात यासिनचा सहभाग असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) म्हटले होते.

Web Title: Yasin Bhatkal, four others convicted in Dilsukhnagar blast case