योगविद्येचा धर्माशी काहीही संबंध नाही: व्यंकय्या नायडू

पीटीआय
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

योगाचा धर्माशी अजिबात संबंध नाही. मात्र दुर्देवाने काही जण या प्राचीन विज्ञान प्रणालीची सांगड धार्मिकतेशी घालतात. असे करण्यामुळे माणुसकीला ते हानी पोचवत आहेत

नवी दिल्ली - 'योगविद्येचा धर्माशी काहीही संबंध नाही. तरी काही जण या प्राचीन विद्येला धर्माला रंग देत असतील तर माणुसकीला तो मोठा धोका आहे,' असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

योगाविद्येच्या क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन होण्याची गरज व्यक्त करून नायडू म्हणाले की, योग म्हणजे स्वास्थाविज्ञान असून अन्य वैद्यकीय शाखांप्रमाणेच याचा अभ्यास व सराव करणे महत्त्वाचे आहे.

"योगाचा धर्माशी अजिबात संबंध नाही. मात्र दुर्देवाने काही जण या प्राचीन विज्ञान प्रणालीची सांगड धार्मिकतेशी घालतात. असे करण्यामुळे माणुसकीला ते हानी पोचवत आहेत,'' अशी टीका नायडू यांनी केली. शारीरिक व्यायाम, मानसिक स्वास्थ, अध्यात्मिक मदतनीस अशा अनेक गोष्टींची जननी योगाभ्यास आहे. वैद्यकीय खर्च कमी राखण्यासही योग मदत करते,'' असे ते म्हणाले.

टॅग्स