योगी मोदींपेक्षा भारी - राम गोपाल वर्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

योगी आदित्यनाथ हे अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व आहेत. मला वाटते, की ते पंतप्रधान मोदींपेक्षा चांगले आहेत.

मुंबई - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे बॉलिवूडमधील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करत आदित्यनाथ मोदींपेक्षा भारी असल्याचे म्हटले आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की योगी आदित्यनाथ हे अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व आहेत. मला वाटते, की ते पंतप्रधान मोदींपेक्षा चांगले आहेत. भविष्यात ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी मला आशा आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीबाबतही वर्मा यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ट्रम्प आपल्या कार्यशैलीने काही साध्य करोत, अथवा न करोत. पण माध्यमांनी हे निश्चित केले पाहिजे की, ट्रम्प यांची कारकीर्द अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील सर्वांत मोठा विनोद म्हणून सर्वांच्याच लक्षात राहतील, असे म्हटले आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी यापूर्वी महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनबाबत ट्विट केले होते. त्यानंतर ते चर्चेत आले होते. त्यानंतर रंगपंचमी हा असा एकमेव सण आहे ज्या दिवशी पुरुष स्त्रीयांना स्पर्श करू शकतात, असे ट्विट केले होते. आता योगी आदित्यनाथ यांच्याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.