योगींच्या हाती झाडू; 'स्वच्छ उत्तर प्रदेश' मिशन सुरू

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

योगी आदित्यनाथ आज सकाळी लखनौमधील रस्त्यांवर झाडू घेऊन उतरले. लखनौमधील बालू अड्डा मलिन बस्ती परिसरात त्यांनी झाडू मारत परिसर स्वच्छ केला. त्यांच्यासोबत अनेक कॅबिनेट मंत्री आणि नेते उपस्थित होते.

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेला पाठबळ देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (शनिवार) सकाळी झाडू हातात घेऊन स्वच्छता करत स्वच्छ उत्तर प्रदेश अभियानाला सुरवात केली.

योगी आदित्यनाथ आज सकाळी लखनौमधील रस्त्यांवर झाडू घेऊन उतरले. लखनौमधील बालू अड्डा मलिन बस्ती परिसरात त्यांनी झाडू मारत परिसर स्वच्छ केला. त्यांच्यासोबत अनेक कॅबिनेट मंत्री आणि नेते उपस्थित होते. तसेच त्यांनी सार्वजनिक शौचालयाचेही निरीक्षण करत सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांमध्ये साफ-सफाईबाबत जागरुकता निर्माण करून, उत्तर प्रदेशला स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या नंबरचे राज्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ध्येय आहे.

केंद्र सरकारकडून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशातील 100 स्वच्छ शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील एकही शहराचा समावेश नाही. उत्तर प्रदेशातील 50 शहरांपैकी 25 शहरे सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये आहे. त्यामध्ये गोंडा हे शहर सर्वांत अस्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयांमध्ये गुटखा खाण्यास मनाई केली आहे. तसेच साफ-सफाई, पाणी, वीज आणि रस्ते यावर जास्त भर दिला आहे. 

Web Title: Yogi Adityanath Picks Up Broom, Kick-Starts Clean Uttar Pradesh Mission