दोन बहिणींवर अत्याचार करणार युवक अटकेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नवी दिल्ली- राजधानीत गेल्या नऊ महिन्यांपासून दोन लहान बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्ली- राजधानीत गेल्या नऊ महिन्यांपासून दोन लहान बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पश्चिम दिल्लीमधील तिलक नगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी 22 वर्षाच्या युवकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून तो 17 व 13 वर्षांच्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करत होता. पीडित बहिणीने अत्याचाराची माहिती आपल्या मैत्रिणीला सांगितली होती. तिचे वडिल स्वयंसेवी संस्थेत काम करत आहेत. मैत्रिणीच्या वडिलांनी याबाबतची माहिती पोलिसांना देऊन तक्रार दाखल केली. या घटनेनंतर युवकाला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलींच्या वडिलांचे दोन वर्षांपुर्वी निधन झाले असून, आई कर्करोगाने आजारी आहे. अत्याचार करणारा भाऊ एका ट्रान्स्पोर्ट कंपनीमध्ये पैसे गोळा करण्याचे काम करत आहे.'

पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, 'युवकाला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे. दिल्लीत सरासरी दिवसाला 4 महिलांवर बलात्कार होत आहे. सन 2012 ते 2015 मधील ही आकडेवारी आहे.'