पुणे : प्राध्यापकांच्या अर्थसाक्षरतेचा निकाल अंतिम टप्प्यात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या अर्थसाक्षरते विषयी संशोधन करण्यात येत असून, त्याचा निकाल आता अंतीम टप्प्यात आला आहे.
PhD Interviews for second round of course will held in May Savitribai Phule of Pune University
PhD Interviews for second round of course will held in May Savitribai Phule of Pune UniversitySakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या अर्थसाक्षरते विषयी संशोधन करण्यात येत असून, त्याचा निकाल आता अंतीम टप्प्यात आला आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Pune University) संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या (Professor) अर्थसाक्षरते विषयी संशोधन (Research) करण्यात येत असून, त्याचा निकाल आता अंतीम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गरवारे वाणिज्य महाविद्यालय आणि विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासनाच्या वतीने यासंबंधीचा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

वर्षभरापासून चालू असलेल्या या संशोधन प्रकल्पावर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मुकुंद तापकीर म्हणाले, ‘प्राध्यापक हे येणाऱ्या पिढीला दिशा दर्शवण्याचे कार्य करतात, विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यात त्यांचा मोलाचा हातभार असतो. अशा या समाजातील उच्च शिक्षणातील महत्त्वाचा भाग असलेल्या प्राध्यापकामध्ये अर्थ साक्षरता कितपत आहे हे जाणून घेणे या संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.’ संशोधनाचे मार्गदर्शक म्हणून डॉ. तापकीर यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी काम पाहीले. या संशोधनाचे मुख्य संशोधक डॉ. गणेश पटारे असून, त्यांच्या महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांचा चमू यात कार्यरत आहे.

संशोधनाचे मेंटॉर म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती बोर्डाचे संचालक डॉ. सतीश मराठे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ एन.एस. उमराणी आणि प्राचार्या डॉ. गीता आचार्य कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यासाठी डॉ. नागनाथ माने, अहमदनगर जिल्ह्यासाठी डॉ. संजय कळमकर तसेच नाशिक जिल्ह्यासाठी डॉ. गणेश पाटील आणि डॉ. संतोष दळवी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

संशोधनाचा उद्देश -

प्रत्येक व्यक्ती जरी नियमित अर्थार्जन करत असला, तरी तो त्याचे वैयक्तिक वित्तीय, गुंतवणूक आणि कर नियोजन करत असेलच असे नाही. भारतात जास्त प्रमाणात गुंतवणूक ही बँक ठेवी मध्ये, रियल इस्टेट मध्ये होते, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये शेअर बाजारातील प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुलनेने खूपच कमी आहे. या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी उच्च शिक्षणातील प्रमुख घटकांपासून सुरवात व्हावी या उद्देशाने हे संशोधन सुरू आहे. हे संशोधन पूर्णत्वाच्या दृष्टीने अंतिम टप्यात आहे. लवकरच संशोधन अहवाल विद्यापीठ तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेस सादर करण्यात येईल, अशी माहिती डॉ. पटारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com