पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांची नियुक्तीचा प्रश्न अखेर सोमवारी सुटला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपली आहे.
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune UniversitySakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपली आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिष्ठात्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपली आहे. विद्यापीठामार्फत अधिष्ठात्यांचा अतिरिक्त कार्यभार संबंधितांकडे सोपविण्यात आला असून त्यानुसार जबाबदारी स्वीकारून रुजू होण्याचे आदेशही विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत.

विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या कार्यकाळात नियुक्त केलेले प्र-कुलगुरू आणि अधिष्ठात्यांचा कार्यकाळ कुलगुरूंच्या समवेत संपतो. त्यानुसार यापूर्वी असणाऱ्या चारही अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी कायदेशीर बाबी तपासून अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे जाहीर केले.

त्याप्रमाणे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. पराग काळकर, मानव्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. विजय खरे आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता म्हणून डॉ. दीपक माने यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतची पत्रे अधिष्ठात्यांना देण्यात आली असून जबाबदारी स्वीकारण्यास सांगण्यात आले असून त्यांनी सोमवारपासून जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. ‘अधिष्ठाता’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com