पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव वेळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार, म्हणजेच ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Pune University
Pune UniversitySakal
Summary

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार, म्हणजेच ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार, म्हणजेच ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून मिळणार असून दोन पेपरमध्ये अंतर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पारंपारिक ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या लेखी परीक्षेची तयारी जोमाने करावी लागणार आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा एकसमान पद्धतीने होण्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. त्यानुसार उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा करून त्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिली आहे. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षेच्यासंदर्भात चर्चा झाली. कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील, असे सामंत यांनी जाहीर केले. त्यानुसार पुणे विद्यापीठाने ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने परीक्षा घेणार असल्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले.

या परिपत्रकानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सम सत्र आणि इतर परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. नियमित सम सत्राच्या परीक्षेमधील दोन पेपरमध्ये किमान दोन दिवसांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय लेखी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात येईल. विद्यार्थी ज्या पॅटर्नमध्ये परीक्षा देणार आहेत, त्याच पॅटर्नमधील प्रश्नसंच विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच दिवसभरातील सलगच्या दोन पेपरमध्ये एक तासाचे अंतर ठेवण्यात येणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑफलाइन पारंपारिक पद्धतीने घेण्याबाबत जाहीर केलेल्या सूचनांनुसार महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यांना आपल्या स्तरावरून सूचित करावे व त्यांच्या शंकाचे निरसन करून विद्यापीठास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. काकडे यांनी या परिपत्रकाद्वारे महाविद्यालयीन प्राचार्य, संचालक, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com