'स्वप्न' साकार! 8 वी पास महिलेची मुलं IPS अधिकारी अन् मुलगी झाली कलेक्टर

Kaushalya Bansal
Kaushalya Bansalesakal
Summary

मी आठवीपर्यंत शिकले असले, तरी मुलांना खूप शिकवलं, असं त्या अभिमानानं सांगतात.

महासमुंद : जिथं इच्छा असते, तिथंच मार्ग असतो असं म्हणतात. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) महासमुंद येथील कौशल्या बन्सल (Kaushalya Bansal) या गृहिणीचीही अशीच काहीशी कहाणी आहे. जिनं आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कठोर परिश्रम घेतलं. स्वतःची स्वप्नं झाकून ठेवून मुलांना नव्या भविष्याची स्वप्नं दाखवली. मग, शेवटी मुलांनीही आई-वडिलांचं स्वप्न साकार केलं. यूपीएससी आणि सीजी पीएससी परीक्षांमध्ये यश मिळवल्यानंतर, मुलं आता आयआरएस, आयपीएस (IPS) आणि डेप्युटी कलेक्टर यांसारख्या पदांवर विराजमान आहेत.

ही गोष्ट आहे महासमुंदमधील कौशल्या बन्सलची! महासमुंद जिल्ह्यातील (Mahasamund District) बसना येथील रहिवासी असलेल्या कौशल्या बन्सलचं वयाच्या 17 व्या वर्षी 1974 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांना आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं. कारण, 5 भाऊ आणि 5 बहिणींचा भार एकट्या कौशल्या यांच्यावर होता. दरम्यान, त्यांना अभ्यासाचीही आवड होती. मात्र, लग्नानंतर ती स्वप्नं स्वप्नच राहिली. परंतु, त्यांनी तीच स्वप्नं आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पाहिली. त्या स्वतः आई झाल्यावर मुलांच्या शिक्षणाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचा निर्धार केला होता. यामध्ये त्यांना पतीनंही पूर्ण साथ दिली.

Kaushalya Bansal
फुगं विकणाऱ्या मुलीचं रातोरात बदललं 'आयुष्य'

मी आठवीपर्यंत शिकले असले, तरी मुलांना खूप शिकवलं, असं त्या अभिमानानं सांगतात. कौशल्या बन्सल यांना चार मुलं आहेत. मोठा मुलगा श्रावण बन्सल जीएसटी रायपूरमध्ये (Raipur) आयुक्त पदावर आहे. दुसरा मुलगा मनीष बन्सल हा वडिलांचा व्यवसाय सांभाळणारा यशस्वी व्यापारी आहे. तर, धाकटा मुलगा त्रिलोक बन्सल आयपीएस आहे. सर्वात धाकटी मुलगी शीतल बन्सल ही देखील उपजिल्हाधिकारी आहे. मुलांच्या यशानंतर आता आईला स्वतःचा अभिमान वाटतोय. अशी मुलं असणारे पालक खूप कमी असतात, जे आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात. सर्व मुलं सेटल झाल्यावर वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी स्वतः दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्या उत्तीर्णही झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com