लठ्ठपणाकडून  नवजीवनाकडे

लठ्ठपणाकडून  नवजीवनाकडे

प्रत्येकाला स्वतःमध्ये चांगला बदल हवाहवासा वाटतो. जशी अनाथ सिन्ड्रेलाला तिच्या परिरूपी आईने तिच्यात बदल घडवायला मदत केली. अगदी तशीच सुधारणा कॉस्मेटिक सर्जरीमुळे होते. लोकांना त्यांचे स्वतःचे चांगले स्वरूप हवे असते. म्हणून ते जिमला जातात. फॅशनेबल कपडे घालतात, महागडे हेअरकट्‌स करतात, केस प्रत्यारोपण आणि बोटॉक्‍स करतात. बहुतेकांसाठी सौंदर्योपचार हे वर्धिष्णू असतात. ती एक काही अंशांनी होणारी सुधारणा असते. सामान्य रूपाकडून चांगल्या रूपाकडे आणि चांगल्या रूपाकडून अधिक चांगल्या रूपाकडे; पण असेही काही लोक आहेत, ज्यांच्यासाठी हा बदल जलद आणि मूलभूत स्वरूपाचा असतो. जेथे शारीरिक, तसेच मानसिक बदल इतके सखोल असतात, की जणू त्यांचा पुनर्जन्मच होतो. हे लोक बॅरिॲट्रिक किंवा वेटलॉस सर्जरीचा पर्याय अनुसरतात. त्यांच्यासाठी शारीरिक बदलाचे मापन हे त्याचाच उपसिद्धांत असलेल्या सामाजिक बदलावर आधारित आहे. प्रीती पॉल (नाव बदललेले आहे) ही चेन्नईची २८ वर्षीय तरुणी ‘करिअर वूमन’ आणि गृहिणी म्हणून गेल्या आठ वर्षांपासून आव्हानात्मक जीवनशैलीचा सामना करत आहे. ‘‘माझ्या नवऱ्याचा माझ्यातला रस संपला,’’ पॉल सांगते. ‘‘प्रियाराधनाच्या चार वर्षांच्या काळात त्याचे प्रेम व आकर्षण उडून गेले. तोपर्यंत मी शंभर किलो वजनापर्यंत मजल मारून त्याही पलीकडे गेले होते. मग माझा नवरा रोजच उशिरा कामावरून परत येत असे. आमच्या संबंधांतला रस जवळपास नाहीसा झाला होता. क्वचित कधी आम्ही एका खोलीत असू तेव्हा तो माझ्याकडे बघण्याचेही टाळत असे ः जणू काही माझ्या शरीरामुळे तो माझ्यापासून दूर ढकलला जात होता. आम्ही सहा वर्षे शरीरसंबंध ठेवले नव्हते आणि मी अगदी एकाकी झाले होते.’’ तिला जितका त्रास होत होता, त्याप्रमाणात तिचे खाणे वाढले होते. अशा प्रकारे ती स्वतःबद्दलची नाराजी, नैराश्‍य आणि वजनवाढ या दुष्टचक्रात अडकली होती.

पॉल, जिने आधी आपल्या कुटुंबाला आपल्या या दुःखाबद्दल अंधारात ठेवले होते, तिने गेल्या वर्षी त्यांना ती ‘बॅरिॲट्रिक सर्जरी’चा पर्याय स्वीकारणार असल्याचे सांगितले. वजन कमी करण्याच्या इतर पारंपरिक पद्धती तिच्याबाबतीत अयशस्वी ठरल्या होत्या. भारतीय मापदंडानुसार बीएमआय ३७.५ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि वजनाशी संबंधित कोणतेही विकार असल्यास अशी व्यक्ती शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरते. शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी पॉलने सकस आहार आणि नियमित व्यायाम यांच्या आधारे वजनाचा काटा सत्तर किलोवर आणला. ती आता पूर्वीच्या निम्मी झाली आहे आणि तिचे रूपही पूर्ववत होऊ लागले आहे. आता तिच्या नवऱ्यानेही पलटी खात तिच्याकडे अधिक लक्ष द्यायला सुरवात केली आहे. तिच्यासाठी ‘गिफ्ट’ म्हणून लक्षद्वीपची सहल ‘बुक’ केली. आता समीकरण बदलले आहे. जणू ‘माझ्या अदृश्‍यपणाचा बुरखा वर उचलला गेला आहे,’ पॉल तिरकसपणे सांगते. ‘‘माझ्या नव्या आयुष्याने मला नवा आत्मविश्‍वास दिला आहे. मी आता ‘ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट’ म्हणून एका बॅंकेत काम करत आहे. मी आता माझे स्वतःचे पैसे कमावते. माझे निर्णय स्वतः घेते आणि हो, मी माझे काम आणि ‘फॅमिली लाइफ’ दोन्ही ‘एन्जॉय’ करते. जेथे मी माझ्या सूडाची भावना बाळगत नाही. जवळपास दशकभराच्या एकटेपणानंतर मी आता माझ्याकडे असलेल्यापैकी काही अंश परत करत आहे.’’

आमच्या ‘ओबेसिटी सोल्युशन्सच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर केअरमध्ये आम्ही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतरच्या नव्या जीवनशैलीसाठी आणि सुधारित नातेसंबंधासाठी तयार करतो. बॅरिॲट्रिक आणि मेटॅबॉलिक सर्जरीमुळे इच्छा, गुणवत्ता व समाधान यांच्या स्वरूपात लैंगिक आणि जननविषयक इच्छा वाढते. भारतात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना लठ्ठपणाच्या सामाजिक परिणामांना अधिक सामोरे जावे लागते. शास्त्रीयदृष्ट्या स्त्रीचे शरीर संप्रेरकांच्या बदलांना आणि आव्हानांना जास्त प्रतिसाद देते. पासष्ट टक्‍क्‍यांहून अधिक महिला बॅरिॲट्रिक सर्जरीचा पर्याय निवडतात. आम्ही आमच्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी आणि इतर इच्छुकांसाठी दरमहा ‘सपोर्ट ग्रुप’चे आयोजन करतो. 

शारीरिक व भावनिक स्थित्यंतरावर मात करण्यासाठी रुग्णाला कुटुंबाचा मोठाच आधार मिळत असतो. अशा लोकांसाठी जीवनाची सुरवात वेगळ्या प्रकारे होते. लठ्ठपणाच्या काळात ती आमूलाग्र बदलते आणि शस्त्रक्रियेनंतर ती परत बदलते. हजारो लोक अतिरिक्त वजनामुळे विविध व्याधींचा सामना करत असतात. लठ्ठपणाचा विकार शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा अंत करतो. या केवळ काट्यावरच्या अतिरिक्त घडामोडी आहेत. ज्या मधुमेह, उच्च मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉइड प्रॉब्लेम्स, हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व, सांध्यांची अकाली झीज, व्हेरिकोज व्हेन्स, फॅटी लिव्हर, किडनी फेल्युअर, अशा अनेक विकारांना आमंत्रण देतात. चयापचयाची क्रिया सुरळीत असेल, तर व्यक्ती फिट व निरोगी राहते व तिचे वजन नियंत्रित राहते. भारतीय आनुवंशिकतेने लठ्ठपणा व मधुमेह यांना बळी पडतात. बिघडलेला चयापचय, प्रमाणाबाहेर भूक, अतिरेकी वजनवाढ, साध्यासुध्या वजन नियंत्रणाच्या उपायांना दाद न देणे, मान, काखा या ठिकाणी येणारा काळेपणा, सुस्ती, थकवा, लैंगिक क्रियेच्या इच्छेचा व शारीरिक हालचालींचा अभाव वा स्वरूपात अस्तित्वात असतो. सुदैवाने बॅरिॲटिक आणि मेटॅबॉलिक ट्रिटमेंट्‌स या रुग्णांसाठी वरदान ठरल्या आहेत. 

काळजी करू नका! तुमची अंतर्गत हार्मोनल यंत्रणा सुधारून तुमचा चयापचय सुधारता येऊ शकतो. जगभरात मेटॅबॉलिक थेरपीज व लॅप्रोस्कोपिक बॅरिॲट्रिक सर्जरीजनी लाखो लठ्ठ माणसांची आयुष्ये रोगट ते निरोगी, निराश ते आत्मविश्‍वासू, डायबेटिक ते नॉन डायबेटिक अशा प्रकारे बदलली आहेत. हे जादा किलोग्रॅम झटकून टाकल्याने शरीर अतिरिक्त मेदाच्या वाईट परिणामांमुळे होणाऱ्या मेकॅनिकल आणि केमिकल ओझ्यातून मुक्त होते. वेटलॉस दीर्घकाळासाठी टिकवण्यास आणि रोगांवर मात करण्यास मदत करणारी ही साधने शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केलेली आहेत. लठ्ठपणाशी संबंधित सर्व वयोगटातल्या सर्व प्रकारच्या व्याधींनी पीडित असलेल्या लोकांना मदत करता येऊ शकते. आपल्या सुरवंटाकडून फुलपाखराकडे होणाऱ्या प्रवासात सहभागी होण्यात आनंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com