इजिप्त:टँटा शहरात चर्चमध्ये स्फोट; 15 जण ठार

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

टँटा शहरातील निले डेल्टा भागात मार गिरगीस कॉप्टीक चर्च आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. बसमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. 

कैरो - इजिप्तमधील कैरो शहरापासून उत्तरेकडे असलेल्या टँटा शहरातील चर्चमध्ये आज (रविवार) झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जण ठार झाले आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना टँटामधील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. इजिप्तमधील कॉप्टीक ख्रिश्चन समुदायाचे हे चर्च होते. स्फोटात 15 जण ठार झाले आहेत.

टँटा शहरातील निले डेल्टा भागात मार गिरगीस कॉप्टीक चर्च आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. बसमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. 

टॅग्स