वायव्य पाकिस्तानात बॉंबस्फोटात 25 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

पेशावर: पाकिस्तानच्या वायव्य आदिवासी भागात पाकिस्तानी तालिबानने केलेल्या हल्ल्यात सुमारे 25 जण ठार; तर 65 जण जखमी झाले. शिया इमामबर्गाह येथील गर्दीच्या ठिकाणी हा कार बॉंबस्फोट करण्यात आला. मुख्य प्रवेशद्वाराजवळच हा स्फोट झाल्याने फळे आणि भाजीपाला घेत असलेले अनेकजण यात मृत्युमुखी पडले.

जखमी झालेल्यांपैकी अनेकांची स्थिती गंभीर असून, काहींना गंभीर जखमा झाल्या आहेत. यातील 27 जणांना हवाईमार्गे पेशावर येथील रुग्णालयात नेण्यात आले. या स्फोटात अनेक गाड्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, इमामबर्गाह येथे सुरक्षारक्षक भाविकांना तपासत असताना एका अनोळखी माणसाने जवळच कार लावली व काही वेळातच तिचा स्फोट झाला. दरम्यान, पाकिस्तानी तालिबानच्या जमात-उल-अहरार या फुटीर गटाने या स्फोटाची जबाबदारी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.