इराकमधील आत्मघातकी स्फोटात 35 जण ठार 

यूएनआय
रविवार, 21 मे 2017

बगदाद : बगदाद आणि दक्षिण इराकमध्ये करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 35 जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाल्याचा दावा इस्लामिक स्टेटने आज केला आहे. काल रात्री हा हल्ला करण्यात आला. मात्र गेल्या सात महिन्यांपासून इराकी सैन्य मोसूलमध्ये जिहादींशी लढाई करीत आहे. बगदादच्या दक्षिण भागातील अबू दशरी भागात कारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आत्मघातकी बॉंबस्फोटात 24 जण ठार झाले तर 20 जखमी झाले, अशी माहिती ब्रिगेडिअर साद मान यांनी दिली. सुरक्षा दलांनी एकाला ठार केले; मात्र दुसऱ्याने कार बॉंबस्फोटात स्वतःला उडवून घेतले, असे ते म्हणाले. 

या आत्मघातकी हल्ल्याबाबत इस्लामिक स्टेटने एक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्यात हा हल्लेखोर कशा प्रकारे विस्फोटक शरीराला बांधून सुरक्षा दलांबरोबर हल्ल्यासाठी आला हे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्याने कारबॉंबचा स्फोट घडवून आणल्याचे म्हटले आहे. 

दक्षिण इराकमधील बसरा भागात आत्मघातकी हल्लेखोरांनी तपासणी नाक्‍याजवळ वाहनात आत्मघातकी स्फोट घडवून आणला, त्यात 11 जण ठार झाले, तर 30 जण जखमी झाले, असे बसराच्या आरोग्य विभागाचे प्रमुख रियाद अब्दुलमीर यांनी सांगितले. अन्य एक आत्मघातकी हल्लेखोर जो वाहनात स्फोटके भरून निघाला होता, त्याला सुरक्षा दलांनी ठार केले, असे ते म्हणाले.