अफगाणिस्तानमध्ये कार बॉंबस्फोटात 29 जण ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

रमजान सणाच्या पार्श्वभूमिवर महिन्याचा पगार काढण्यासाठी अफगाण लष्करातील सैनिक, सरकारी अधिकारी आणि नागरिकांनी येथील न्यू काबूल बॅंकेच्या शाखेसमोर गर्दी केली होती. ही संधी साधून एका कारद्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आला

लष्कर गाह - शहरातील न्यू काबूल बॅंकेबाहेर घडवून आणलेल्या एका कार बॉंबस्फोटात 29 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात इतर 60 जण जखमी झाले असून, यात लष्करातील काही सैनिकांचा समावेश असल्याची माहिती सरकारच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

रमजान सणाच्या पार्श्वभूमिवर महिन्याचा पगार काढण्यासाठी अफगाण लष्करातील सैनिक, सरकारी अधिकारी आणि नागरिकांनी येथील न्यू काबूल बॅंकेच्या शाखेसमोर गर्दी केली होती. ही संधी साधून एका कारद्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसून, यामागे तालिबानी व इसिस या दहशतवादी संघटनांचा हात असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिन्यात अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यात सहाजण ठार झाले होते.

. . . . . .

ग्लोबल

"युनिसेफ'च्या अहवालातील निष्कर्ष; शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे राष्ट्रांना आवाहन संयुक्त राष्ट्र संघ: जगात कोणत्याही ठिकाणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

इस्लामाबाद: पाकिस्तानचे हकालपट्टी केलेले पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांना पुढील आठवड्यात सुनावणीला हजर राहण्यासाठी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव या नावाचा आणि आपला थेट काही संबंध नाही. पण, कदाचित या पृथ्वीवर आपण अस्तित्वात आहोत, यामागे स्टॅनिस्लाव्ह...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017