अरुंधती रॉय यांना पाकिस्तानचे निमंत्रण?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

इस्लामाबाद - प्रसिद्ध भारतीय लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांना विधानसभेत भाषण करण्यासाठी पाकिस्तानला आमंत्रित करण्याचा विचार पंजाब विधिमंडळ करीत आहे. काश्‍मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर त्या बोलण्याची शक्‍यता आहे. 

काश्‍मीरमधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात रॉय यांनी आवाज उठविला होता. त्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली. हा विषयाची सदस्यांना माहिती देण्यासाठी रॉय यांना पंजाब विधानसभेत निमंत्रित करण्याची सूचना खासदार शेख अल्लाउद्दिन यांनी केल्याचा माहिती येथील "डॉन‘ या वृत्त संकेतस्थळावर दिली आहे. या प्रस्तावाबाबत विधानसभेच्या अध्यक्षांनी गंभीरपणे विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. 

हा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्यानंतरच रॉय यांना पाकिस्तानला बोलवायचे की नाही, याबाबत निर्णय होईल, असे कामगार व मनुष्यबळ विकास मंत्री राजा अश्‍फाक सरवार यांनी सांगितले.