आसियान- दक्षिण चिनी समुद्राच्या मुद्द्याला बगल

पीटीआय
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

लाओस - पुढील आठवड्यात येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई देशांचे आसियान परिषदेत दक्षिण चिनी समुद्रातील वादाबाबत आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या निर्णयाचा मुद्दा टाळण्याचे परिषदेच्या समितीने ठरविले आहे. 

या भागातील बेटांवर चीनचा हक्क असल्याचा दावा लवादाने नाकारला आहे. लाओसवर चीनचा दबाव असल्याने या परिषदेत हा मुद्दा येणार नसल्याचे जवळपास निश्‍चित असले तरी समितीने अधिकृतरित्या हे जाहीर केले आहे. 

या प्रश्‍नाबाबत काही देशांच्या असलेल्या भावना आणि तक्रारींची आम्ही दखल घेतली असून त्याबाबत आगामी काळात चर्चा केली जाईल, असे निवेदन "आसियान‘ समितीने प्रसिद्ध केले आहे. 

Web Title: ASEAN won't discuss about South China Sea issue