आत्मघाती बॉंबस्फोटात बगदादमध्ये 14 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

अमेरिकेच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या कारवाईमध्ये इराक आणि सीरियात "इसिस'ची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे "इसिस'कडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आत्मघाती हल्लेखोराने महिलेचा वेश केला होता

बगदाद - इराकची राजधानी बगदादमध्ये आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात 14 जण मृत्युमुखी पडले असून, 13 जण जखमी झाले असल्याची माहिती सुरक्षा दलांकडून देण्यात आली. "इसिस'ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अमेरिकेच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या कारवाईमध्ये इराक आणि सीरियात "इसिस'ची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे "इसिस'कडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आत्मघाती हल्लेखोराने महिलेचा वेश केला होता. सुन्नी मुस्लिम राहात असलेल्या भागातून बेघर करण्यात आलेल्या मुस्लिम नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निर्वासितांच्या छावणीजवळ हा बॉंबस्फोट करण्यात आला.

इराकमधील मोसूल आणि सीरियातील राका हे "इसिस'चे गड ताब्यात घेण्यासाठी सध्या मोठे युद्ध सुरू आहे.