पाकिस्तानमध्ये न्यायालयाबाहेर स्फोट; 12 ठार

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

पेशावर- वायव्य पाकिस्तानमधील मरदान जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 12 ठार तर 52 जखमी झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाबाहेर आज दुहेरी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वकिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिसर ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी चार बॉम्बस्फोट घडवून आणले असून, सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत चार दहशतवादी ठार झाले आहेत.